breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा’; अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर विधानसभेत खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत निलेश लंकेंच्या विरोधात जोरदार टीका केली. निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच, अशा शब्दात अजित पवार यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली.

अजित पवार म्हणाले की, पारनेरसाठी उमेदवार शोधत असताना माझ्या जवळच्या लोकांनीच मला निलेश लंकेची भेट घालून दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेखातर मी निलेश लंकेला उमेदवारी दिली. पण मला वाटलं नव्हतं हा बाबा नंतर दिवे लावेल. गडी दिसायला बारीक, पण लई पोहोचलेला आहे. त्याला विकासकामांसाठी खूप निधी दिला. मला वाटायचं गरीब घरातला आहे. चांगलं काम करतोय. पण नंतर मला त्याची लक्षणं कळायला लागली.

हेही वाचा     –      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘महा रोड शो’ने होणार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराची सांगता

अधिकाऱ्यांनाही खुलेआम धमक्या देण्याचा प्रकार निलेश लंकेने केला. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे लंके धमक्या देत होते. मी उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना अतिशय नम्रतेने बोलतो. त्यांना आदर देतो. पण हा पठ्ठ्या तर ‘ऐ कलेक्टर इकडं ये’ असं बोलायचा. पोलिसांशी बोलताना ‘मी तुमचा बाप बोलतोय’ अशा धमकीच्या स्वरात बोलायचा. अरे निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझा कंड असा जिरवीन की तुला सतत अजित पवारच दिसेल, असं अजित पवार म्हणाले.

तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती आहे. तू फार शहाणपणा करू नको. मी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत राहतो. जर तू आमच्या माणसाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर तुला बघून घेईन. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button