‘मी शरद पवारांना सोडलेलं नाही’; अजित पवारांचं मोठं विधान
![Ajit Pawar said that I have not abandoned Sharad Pawar.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ajit-Pawar-4-780x470.jpg)
Ajit Pawar | बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींना वाटत असेल की मी साहेबांना सोडायला नको होतं. पण मी साहेबांना (शरद पवार यांना) सोडलेलं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, की तुम्हाला काहींना वाटत असेल की मी (अजित पवार) साहेबांना (शरद पवार) सोडायला नको होतं. मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही. मी साहेबांना सांगत होतो की सर्व आमदारांचं मत होतं. माझ्या एकट्याचं मत नव्हतं. सर्व आमदारांच्या सह्या आहेत. सर्वांचं मत होतं की सरकारमध्ये जावं. आता सरकारमध्ये का जावं? तर कामाला स्थगिती आली होती.
हेही वाचा – यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी
आज या ठिकाणी बसलेल्यांपैकी संभाजी आणि राजवर्धन यांना विचारा. आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती आली होती. तेव्हा म्हटलं हे तर तापच झाला. लोक मला तर वेढ्यात काढतील कारण पैसे पाठवले आणि स्थगिती दिली. आता ती स्थगिती मी नव्हती दिली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. स्थगिती सरकारने दिली होती, असंही अजित पवार म्हणाले.