breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बुलेटवर बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय; अजित पवारांचं विधान

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. आज सिन्नरमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी या तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना बुलेट सवारीचा आनंद दिला.

अजित पवार म्हणाले, मी कॉलेज जीवनात आणि शेती करत असताना मोटरबाईक वापरायचो. त्यामुळे मोटरबाईकवर फिरायला मला आवडतं. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने आता अडचणी येतात. पण आता बसलोय. तारूण्यात खूप फिरलो. बऱ्याच जणींना घेऊन फिरलो आहे. खूप दिवसांनी दुचाकीवर बसल्याने खूप चांगली भावना आहे.

हेही वाचा     –      पिंपरी-चिंचवडमध्ये घरोघरी तिरंगा मोहिमेस महापालिकेच्या वतीने प्रारंभ

आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे. राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय-माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरूपी सुरू ठेवल्या जातील. महाराष्ट्राची प्रगत राज्य म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button