ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

तहसील कार्यालयावर आंदोलन

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने

पिंपरी : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तहसिल कार्यालयावर निर्दशने करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या मध्ये कैलास कदम, अजित अभ्यंकर, दिलीप पवार, अनिल रोहम, काशिनाथ नखाते, धनाजी येळकर, प्रा. सतीश काळे, मानव कांबळे, किशोर ढोकळे, रघुनाथ कुचिक, मारुती भापकर, शशिकांत धुमाळ, शब्बीर इनामदार, प्रविण कदम, भारती घाग, सीता तामचिकर आदींसह कामगार प्रतिनिधी यामध्ये सहभागी होते. या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड मधील विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगारांनी सहभाग घेतला.

या आंदोलनात कामगारांनी पुढील मागण्या केल्या की, यामध्ये पुणे-तळेगावमधील जनरल मोटर्सची आस्थापना बंद करण्यास परवानगी देण्याचा निर्णय रद्द करून सर्व कामगारांना त्या काळाचा पूर्ण पगार द्या. कंपनीच्या हस्तांतरणामध्ये कामगार कर्मचाऱ्यांना विनाखंड सेवेची पूर्ण सुरक्षा द्या. उद्योग बंद करण्यास परवानगी देणारे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि कामगार खात्याचे सचिव सिंघल यांचा राजीनामा घ्या. मणिपूर, हरियाणा येथील हिंसक दंगलींना आळा घाला. कामगारविरोधी नवे कामगार कायदे रद्द करा. कंत्राटी प्रथा बंद करून कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा. सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण बंद करा. किमान वेतन दरमहा रूपये 26 हजार करा. कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणेला पूर्ण आणि पुरेसे सक्षम करा. घऱ कामगार, बांधकाम कामगार आदी सर्व असंघटितांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन देणारा कायदा व तरतूद करा. अंगणवाडी-आशा अशा योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व दर्जा द्या, आदी मागण्या करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button