Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना!

supriya sule : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज दिल्लीला रवाना झाल्या. दरम्यान दिल्लीसाठी निघण्यापूर्वी त्यांनी काटेवाडी येथे अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. एकीकडे मुंबईत लोकभवन येथे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होत असताना सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या या भेटीची चर्चा होताना दिसत आहे.

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची लगबग सुरू होती. यावेळी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईची भेट घेऊन बाहेर पडल्या. यावेळी त्यांना या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बजेट सेशन आहे, त्यामुळे मी आशाकाकींना भेटायला गेले. आशाकाकींची परवानगी घेतली, की आशा काकी उद्या बजेट सेशन आहे, मी जाऊ का? आशा काकी म्हणाल्या, हो, देशाचं बजेट आहे, आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फ्लोअर लीडर आहे. मी काकींची परवानगी घेऊन आज दिल्लीला जात आहे.”

हेही वाचा – आजचे करिअरचे निर्णय उद्याच्या गोव्याला आकार देतील; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दरम्यान मुंबईतील सुनेत्रा पवार याच्या शपथविधीबद्दल आपल्याला विश्वासात घेतले नाही का? तसेच या शपथविधीला शरद पवार का नाहीत? याबद्दल सुप्रिया सुळेंना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी हात जोडून “राम कृष्ण हरी” अशी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर (शनिवारी) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button