breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

दवाखान्यातून परतल्यावर ममता बॅनर्जींनी केली प्रचाराला सुरूवात; व्हीलचेअरवर झाल्या सहभागी

मुंबई |

विधानसभा निवडणुकींमुळे पश्चिम बंगाल मधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये प्रचार करताना पायाला दुखापत झाली होती.त्यांच्यामते चार-पाच जणांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले होते. मागील आठवड्यात बुधवारी त्या मंदिराच्या बाहेर प्रार्थनेसाठी थांबलेल्या असताना या टोळीने त्यांना धक्का दिला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकां आणखीन रंगणार याचे चिन्ह दिसत आहे. रविवारी पुन्हा ममता बॅनर्जी प्रचारासाठी कोलकाताच्या रस्त्यांवर परत आल्या. मुख्य म्हणजे यावेळी त्या व्हीलचेअरवर होत्या. त्यांना  रुग्णालयातून घरी सोडून केवळ दोनच दिवस झाले आहेत.

कोलकात्ताच्या मध्यभागी असलेल्या मेयो रोड ते हाजरा येथे मुख्यमंत्री विशाल मेळाव्याचे नेतृत्व करताना दिसल्या. तेथे त्या भाषण करणार आहेत. त्यांचा रोड शो सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “आम्ही धैर्याने लढा सुरूच ठेवू! मला अजूनही खूप वेदना होत आहेत, पण मला माझ्या लोकांच्या वेदनादेखील अधिक जाणवत आहेत. आमच्या सन्माननीय भूमीचे रक्षण करण्यासाठी या लढाईत, आम्ही बरेच काही सहन केले आहे आणि अधिक त्रास सहन करावा लागला तरी आम्ही कधीही झुकणार नाही! ”

 

वाचा- तडीपार गुंडाची हद्दीत येऊन चक्क पोलिसांनाच धक्काबुक्की…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button