breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मी ठाण्यातून लढण्यास तयार’; आदित्य ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. ते विधानभवन परिसराट प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज निवडणूक होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे. मी मुख्यमंत्री यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो.

हेही वाचा  –  ललित पाटील प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण; म्हणाले..

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत. पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही, सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत. त्यांच्यात हिंमतच नाही, हे घटनाबाह्य सरकार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

बोरवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button