breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रियव्यापार

आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला

  • आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

  • आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
  • वेदांतानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर
  • पुढच्या जनआक्रोश आंदोलनाचं ठिकाण ठरलं

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीससरकारवर केला आहे. औरंगाबाद येथे प्रस्तावित असणारा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावातून निघून गेला. आदित्य ठाकरेंनी ऑरिक सिटीतील प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला आहे. मेडिसीन डिव्हाइस पार्क राज्याबाहेर गेला आहे, राज्य सरकारला याची माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. मेडिसीन डिव्हाइस पार्क इतर राज्यात गेलेला आहे. त्या प्रकल्पांसाठी अनुदान देखील जारी करण्यात आलं आहे. राज्य सरकरानं या प्रकल्पाबद्दल माहिती देखील राज्यातील तरुणांना दिलेली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढचं आंदोलन संभाजीनगरमध्ये : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी बिडकीनमध्ये होणारा मेडिकल डिव्हाइस पार्क राज्याबाहेर गेल्याच्या विरोधात पुढचं जनआक्रोश आंदोलन संभाजीनगरमध्ये करणार असल्याचं म्हटलं. आदित्य ठाकरेंनी काल पुण्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन जनआक्रोश आंदोलन करत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button