ताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बॉलिवूड अभिनेत्री, खासदार कंगना रनौतची खासदारकी धोक्यात

कंगना यांच्या खासदारकी विरोधात हिमाचल कोर्टात याचिका दाखल

हिमाचल : बॉलिवूड अभिनेत्री , खासदार कंगना रनौत यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हिमाचल येथील मंडी मतदार संघातून कंगना यांनी लोकसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांना विजयी केलं. पण आता कंगना यांच्या खासदारकी विरोधात हिमाचल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाय याचिकेत कंगना यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. हाय कोर्टाने याचिकेच्या आधारावर कंगना यांना नोटीस देखील जारी केली आहे. संबंधीत प्रकरणावर कंगना यांच्या कडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्याचं नाव लायक राम नेगी असं आहे. नेगी यांनी कंगना यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. शिवाय कंगना यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी कोर्टाकडे केली आहे. लायक नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी नोकरीतून व्हीआरएस घेतली आहे. नेगी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मंडी येथून निवडणूक लढवायची इच्छा होती. पण त्यांचा अर्ज अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नाकारला…

‘माझा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला नसता तर मी विजयी झालो असतो…’ असं नेगी यांचं म्हणणं आहे. म्हणून कंगना यांची खासदारकी रद्द करत मंडी येथे पुन्हा निवडणूक घेण्यात यावी… अशी मागणी नेगी यांनी कोर्टाकडे केली आहे. नेगी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांवी कंगना यांना नोटीस पाठवत 21 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

नेगी पुढे म्हणाले, नामांकनादरम्यान, नेगी यांना सांगण्यात आले होतं की, त्यांना सरकारी निवासासाठी वीज, पाणी आणि टेलिफोनसाठी कोणतेही थकीत प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी रिटर्निंग ऑफिसरकडे कागदपत्रे दिली असता त्यांनी ती स्वीकारण्यास नकार देत उमेदवारी नाकारली. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कंगना रनौत यांचा विजय
कंगना रनौत यांनी मंडी मतदार संघात पहिल्यांदा निवडणूक लढवत विजय मिळवला. लेकसभा निवडणुकीत कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह होते. कंगना यांचा 74,755 मतांनी विजय झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाजवादी पार्टीचे डॉ. प्रकाश चंद्र भारद्वाज होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button