breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘कसबा पोटनिवडणूक रद्द करावी’; अभिजीत बिचुकलेंची अजब मागणी

कसबा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्यानं घ्या

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच आता कसबा पोटनिवडणूक रद्द करावी अशी अजब मागणी अभिनेते आणि अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.

कसब्याचा तिसरा उमेदवार म्हणून मी कसब्याच्या दोन उमेदवारांवर कारवाई करण्याचं पत्र देत आहे. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्यानं घ्या अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.

भाजपा पक्ष पोलिसांना सोबत घेत पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. त्यामुळे भाजपने देखील मतदानावर आक्षेप घेत धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेस उमेदवार धंगेकर यांनी कसबा गणपती समोर उपोषण केले हा अचारसंहितेचा भंग आहे असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे.

कसबा गणपती समोर रविंद्र धंगेकर यांनी आंदोलन करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल भाजपाने तक्रार दाखल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button