Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादवांना धक्का! IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित

IRCTC Scam | बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला असून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)-काँग्रेसची महाआघाडी यांच्यात थेट लढत रंगणार आहे. त्यासोबतच काही स्थानिक पक्षही या स्पर्धेत उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच आरजेडीला मोठा धक्का बसला आहे.

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या न्यायालयीन निर्णयामुळे आरजेडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा      :        व्यक्तिमत्व घडविण्यात संघाचा मोलाचा वाटा : डॉ. निलेश भंडारी

या प्रकरणाबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. यावेळी न्यायालयाने नमूद केलं की, ‘संबंधित नेते षड्यंत्र रचण्यात सहभागी होते आणि सार्वजनिक सेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर करत होते.’

दरम्यान, सीबीआयने तपासलेला हा खटला बीएनआर रांची आणि बीएनआर पुरी या दोन आयआरसीटीसी हॉटेल्सच्या देखभाल कामाच्या कंत्राटांच्या वाटपामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात सीबीआयने आरोप केला आहे की या संदर्भातील कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलं होतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button