breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Indrayani Thadi-2023 : ‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात गावरान खाद्यपदार्थांची जोरदार मेजवानी

अमित शेळके-प्रतिनिधी

भोसरी : ‘इंद्रायणी थंडी’ महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस पार पडला. आज दिवसभर या महोत्सवाला पिंपरी चिंचवड, पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उस्पूर्तपणे प्रतिसाद दिला. दररोज एक ते दीड लाख लोक याठिकाणी येत आहेत. या महोत्सवात प्रवेश द्वाराच्या सुरुवातीला श्री राम मंदिर आयोध्ये प्रमाणे हुबेहुब भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे. त्याच बरोबर एक हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत .

यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध खाद्य पदार्थ, कपडे , बुट, कपडे, साहित्य बुक इत्यादी अश्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून लोक आपला उद्योग घेऊन हा महोत्सवात सहभागी होत आहेत. खाद्यपदार्थांमध्ये मटण भाकरी, थालीपीठ, झुणका भाकर, मिरची ठेचा, बोलाई मटन, कोथिंबीरवडी, मासवडी असे गावरान पदार्थ लोकांना चाखायला मिळतायत. तसेच हे लोक सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, खान्देश, कोकण

तसेच पुढे मातीची भांडी, लोकरीच्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल, मसाले, लोणचे, पापड्या कुरडई, उकडीचे मोदक, सातारी कंदी पेढे असे अनेक स्टॉल याठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच या महोत्सवात शिवकालीन भव्य शस्त्रप्रदर्शन भरलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील ढाली, तलवारी, दांडपट्टे, चिलखत अशी शस्त्रे याठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि शिवकालीन शूर मावळ्यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button