Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
मनसे नेते वसंत मोरेंवर चाहत्याने बनवलं चक्क ‘रॅप’ सॉंग; पाहा व्हिडीओ
![A fan-made rap song on MNS leader Vasant More](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/VASANT-MORE--780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच वसंत मोरे यांच्या एका चाहत्याने त्यांच्या कामाला समर्पित एक रॅप साँग बनवलं आहे. यामध्ये वसंत मोरे यांच्या अनेक कामांचा उल्लेख केला आहे.
पुणे शहरातील गोखले नगर भागातील सागर हरगावकर या तरूणाने वसंत मोरे यांच्या कामावर प्रेरित होऊन हा रॅप साँग बनवलं आहे. हा व्हिडीओ वसंत मोरे यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.