गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा! उमेदवाराने चक्क अर्ज भरायला आणली १० हजारांची चिल्लर
![A candidate brought a chiller of ten thousand rupees to fill the by-election application](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/candidate-brought-a-chiller-of-ten-thousand-rupees-780x470.jpg)
पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्यांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. यात एका उमेदवाराने चक्क अर्ज भरायला येताना १० हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला आणि अर्ज भरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली होती. यामध्ये १, २, ५ आणि १० रूपयांची नाणी होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाल्याचे पहायला मिळाले.
यावेळी, मकरंद अनासपुरे यांच्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा” या गाजलेल्या मराठी चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. या चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं आहे. असाच काहीसा प्रकार चिंचवड या ठिकाणी घडला आहे. या प्रकारामुळे रवी काळे हे चर्चेत आले आहेत.