महागाईचा भडका! गॅस सिलेंडर २०९ रुपयांनी महागला
LPG Gas Price : दसरा, दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आजपासून कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एका गॅस सिलेंडरसाठी १७३१ रुपये मोजावे लागतील. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये २०९ रुपयांनी वाढ केली आहे.
या वाढीव किमती आजपासूनच लागू होणार आहेत. ओमसीकडून १ सप्टेंबर रोजी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १५८ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर महिनाभराने किमतीमध्ये ही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कमर्शियल सिलेंडरची किंमत १५२२ रुपयांवरून वाढून आता १७३१.५० रुपये झाली आहे.
हेही वाचा – २ हजारांच्या नोटा जमा करण्यास RBI कडून मुदतवाढ
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात देशभरातील सर्व कनेक्शन धारकांसाठी घरगुती सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर महिनाभरातच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.