Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बिहारमध्ये १२५ युनिट वीज मोफत! निवडणुकीपूर्वी नीतीश कुमार यांची मोठी घोषणा

Bihar Elections 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे १.६७ कोटी कुटुंबांना होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ही योजना जुलै २०२५ च्या वीज बिलापासून लागू होणार असून, यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. नीतीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. याशिवाय, राज्य सरकारने पुढील तीन वर्षांत १०,००० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, गरिब कुटुंबांना मोफत सौरऊर्जा संयंत्रे उपलब्ध करून देण्याची योजनाही जाहीर केली आहे.

हेही वाचा     :        नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल; विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मात्र, या घोषणेवर विरोधकांनी टीका केली आहे. यापूर्वी १०० युनिट मोफत वीज देण्याच्या बातम्यांचे खंडन करणाऱ्या सरकारच्या या ‘यू-टर्न’ला विरोधकांनी निवडणुकीपूर्वीचा राजकीय डावपेच ठरवले आहे. काहींनी नीतीश कुमार यांनी यापूर्वी मोफत वीज योजनेला अव्यवहार्य ठरवल्याचा उल्लेख करत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button