breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

सुशांत हा महाराणा प्रतापांचा वंशज, आत्महत्या शक्यच नाही, आरजेडी आमदार अरुण यादवांची वादात उडी

मुंबई: सुशांंत सिंंह राजपूत प्रकरण हे बिहारच्या येत्या विधानसभा निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. कधी भाजप (BJP) कडुन सुशांंतच्या नावाचे पोस्टर, स्टिकर्स वाटले जातायत तर कधी भाजप कसं सुशांंतचा वापर करतंय हे सांंगत अन्य पक्षाकडुन प्रचार केला जातोय एकुण काय तर हे प्रकरण सध्या राजकीय दृष्ट्या सुद्धा बरेच तापलेले आहे, अशातच आता आरजेडी आमदार अरुण यादव यांंनी एक वादग्रस्त विधान केले आहे.

अरुण यादव यांंनी उत्साहात येत सुशांंतच्या जातीवरुन भाष्य केलेलं आहे, ते म्हणतात की, सुशांंत सिंंह हा राजपूत असुच शकत नाही कारण महाराणा प्रताप यांंचा वंशज कधी आत्महत्येचा विचार करुच शकत नाही, एक खरा राजपूत (क्षत्रिय) नेहमी लढायला तयार असतो, जर तो खरा क्षत्रिय असता तर त्याने सुद्धा लढा द्यायला हवा होता. यापुर्वी सुशांंत सिंह राजपूत हे प्रकरण महाराष्ट्रातील सरकार मध्ये सुद्धा विरोधी आणि सत्ताधार्‍यांंमधील वादाचा मुद्दा ठरले होते. खरंंतर सुशांंत चा मृत्यु हा आत्महत्या होता की हत्या यावरही अजुन तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button