breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सीएए’ला विरोध केल्याने भाजपच्या दोन पदाधिका-यांचे निलंबन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कारवाई

परभणी | महाईन्यूज

सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात परभणी नगरपालिकेत ठराव पारित करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविल्याने विनोद हरीभाऊ बोराडे आणि पालम नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची भाजपतून हकालपट्टी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने केला आहे. या कायद्याच्या विरोधात आपण नगर परिषदेत प्रस्ताव आणून त्याचे समर्थन करून आपण पक्षाविरोधी कृत्य केलं आहे. ही कृती अनुशासन भंग करणारी असून पक्षाने याची गंभीर दखल घेतली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.

परभणीतील सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांना एनआरसी आणि सीएए विरोधात प्रस्ताव करणं महागात पडलं आहे. या दोघांवर कारवाई झाली आहे. विनोद बोराडे हे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणल्याने दोघांवर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button