breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार यांचे नागपुरात आगमन

नागपूर | महाईन्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी संध्याकाळी नागपूरला आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

शरद पवार विदर्भातील नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे विदर्भात भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न तर पवार करत नाही ना, अशा चर्चांना उधान आले आहे. वास्तविक पाहता विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु २०१४ मध्ये भाजपने त्याला छेद दिला होता आता मात्र पुन्हा या किल्ल्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादीची बांधणी करण्यासाठी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button