breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

विमान इंधन, विनाअनुदानित एलपीजीची दरवाढ

तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांत वाढ झाल्यामुळे विमानाच्या इंधनाचे (एटीएफ) दर मोठय़ा प्रमाणावर, म्हणजे ५६.५ टक्क्यांनी, तर स्वयंपाकाच्या विना-अनुदानित गॅसचे दर सिलिंडरमागे ११.५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. मात्र, विक्रमी सलग ७८व्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही.

अ‍ॅव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ)चे दर किलोलिटरमागे १२,१२६.७५ रुपयांनी किंवा ५६.५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने दिल्लीत त्याची किंमत किलोलिटरला ३३,५७५.३७ रुपये झाली असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी दरांबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. फेब्रुवारीत एटीएफच्या दरातील कपातीचे चक्र सुरू होण्यापूर्वी दिल्लीत हे दर किलोलिटरला ६४,३२३ रुपये होते आणि गेल्या महिन्यात ते २१,४८८ रुपयांपर्यंत खाली आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या इंधनाच्या किमती भडकल्यामुळे ही वाढ आवश्यक झाल्याचे या उद्योगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याचप्रमाणे, विनाअनुदानित एलपीजीच्या १४.२ किलोग्रॅम सिलिंडरची किंमत ११.५० रुपयांनी वाढून ५९३ रुपये करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅसमध्ये गेले तीन महिने घट झाल्यानंतर करण्यात आलेली ही वाढ आहे. ज्यांनी अनुदानाचा त्याग केला आहे, किंवा ज्यांनी अनुदानित दरातील १२ सिलिंडरचा वर्षांचा कोटा वापरला आहे, अशा घरगुती ग्राहकांना या दराने सिलिंडर घ्यावे लागतात. यापूर्वी तीन वेळच्या कपातींमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत २७७ रुपयांनी घटवण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button