breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

नवी दिल्ली | चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी संसदेत मांडण्यात आला. या अहवालात पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ मध्ये देशाचा आर्थिक विकास दर ६ ते ६.५ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून घसरलेल्या आर्थिक विकास दराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवालातील हा अंदाज देशासाठी दिलासादायक म्हणावा लागेल.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये देशांतर्गत एकूण उत्पादन (जीडीपी) दर ४.५ टक्के इतका राहिला आहे. मार्च २०१३ नंतर पहिल्यांदाच जीडीपी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीचा दर ५ टक्केच राहिल, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे. २००८-०९ नंतर पहिल्यांदाच जीडीपी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. या विषयावरूनच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button