breaking-newsराजकारणराष्ट्रिय

लोकांचे बूटपॉलिश करुन ‘हा’ उमेदवार मागतोय मत

मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते प्रचारसभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढत आहेत. तर दुसरीकडे काही असे उमेदवार आहेत की, जे थेट लोकांमध्ये जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. प्रत्येकजण मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरताना दिसतोय. भोपाळमध्ये एका उमेदवाराने अशीच शक्कल लढवली आहे. ‘बूट’ हे मतदानचिन्ह असलेला हा उमेदवार चक्क लोकांचे बूट आणि चपला मोफत पॉलिश करुन देत आहे. सध्या भोपाळमध्ये हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Bhopal: Sharad Singh Kumar from Rashtriya Aamjan Party whose election symbol is a shoe, polishes shoes of people ahead of ;says,”it was a free poll symbol that no one was willing to take. We took it & we will turn it into a blessing”

२५ लोक याविषयी बोलत आहेत

शरदसिंह कुमार असे उमेदवाराचे नाव असून ते राष्ट्रीय आमजन पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढत आहेत. आपल्या या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना शरदसिंह म्हणाले की, माझ्या मतदान चिन्ह हे बूट आहे. प्रचारासाठी मी लोकांचे बूट आणि चपला पॉलिश करुन देत आहे. निवडणूक आयोगाकडून बूट या चिन्हाचा पर्याय होता. परंतु, कोणीच हे चिन्ह घेण्यास तयार नव्हते. मी स्वत:हून हे चिन्ह घेतले. आता मी लोकांचे बूट पॉलिश करुन माझा प्रचार करत आहे. मी हा लोकांचा आशीर्वादच समजतो, असही शरदसिंह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button