breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राजस्थानमध्ये सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटवण्याचे दिले आदेश…

काँग्रेस हे स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी असल्याचं त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे.. काँग्रेस पक्षाचं मुखपत्र असलेल्या शिदोरीतून 8 फेब्रुवारीच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ प्रकारचा लेख प्रसिद्ध केल्यानंतर आता सावरकरांचा अपमान करणारं आणखी एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे… राजस्थानमधील काॅंग्रेस सरकारनं राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत…या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्याता निर्माण झाली आहे…

राजस्थानचे मुख्यमंत्र्यी अशोक गहलोत यांच्या सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचे पत्रक सर्व शाळांनाही पाठवण्यात आलेत…तसेच, ज्या शाळांमधून हे फोटो काढले जाणार नाहीत, त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही यामध्ये म्हटलंय… 

राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपानं आक्षेप घेतला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच, राज्यातील सरकारी शाळांमधून सावरकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढू देणार नाही, असा इशाराही राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी दिला आहे.

मात्र याच निर्णयावर राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी आक्षेप घेतला “काँग्रेस सरकारला राज्यातील सरकारी शाळांमध्ये फक्त एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो लावायचे आहेत. मात्र, भाजपा हे कधीच सहन करणार नाही.”

गहलोत सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसनं स्पष्ट करत हे नेते विद्यार्थ्यांसाठीही आदर्श नसल्याचेही काँग्रेसचं मत आहे.  या निर्णयामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button