यूपी पोलिसांची गाडी पलटी, मुंबईत पकडलेला गँगस्टर फिरोज अली जागीच ठार; Vikas Dubey Encounter प्रकरणाची पुनरावृत्ती?
मुंबई: कुख्यात गैंगस्टर फिरोज अली याच्या अपघाती मृत्यमुळे पुन्हा एकदा विकास दुबे एन्काउंटर प्रकरणाची लोकांना आठवण झालेली आहे. फिरोज अली यास मुंबई येथील नालासोपारा झोपडपट्टीतून लखनऊ पोलिसांनी अटक केलेली आहे. उत्तर प्रदेश पोलीस ज्या वाहनातून फिरोज अली यास घेऊन निघाले होते त्या वाहनाला अपघात झालेला आहे. या अपघातात फिरोज अली याचा मृत्यू झालेला आहे.
कानपूर एन्काउंटर प्रकरणातील आरोपी विकास दुबेला घेऊन जात असलेल्या वाहनालाही असाच अपघात झाला होता. मात्र, तेव्हा पोलिसांसोबत त्याची चकमक झाल्याचे सांगण्यात आलेले होते. प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गुना येथे पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. ज्यात फिरोज अली होता. उत्तर प्रदेश पोलीस मुंबई येथून पोलीस वाहनाने लखनूकडे निघाले होते. या वेळी या वाहनाला अपघात झाला.
या अपघातात फिरोज अली याचा मृत्यू झाला आहे. तर, त्याच्यासोबत असलेल्या एएसआयसह इतर चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. फिरोज अली हा मुंबई येथील नालासोपारा परिसरात लपलेला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांन दिलेल्या वृत्तात म्हटलेले आहे की, फिरोज अली याला घेऊन निघालेल्या वाहनाची धडक निलगायसोबत झाली आणि अपघात घडला आहे. हा अपघात इतका भायवह होता की, कारचे छत हवेत उडालेले आहे. पोलिसांनी पुढे सांगितलेकी, न्यायालयाने फिरोज अली याला अटक वॉरंट जारी केलेले होते.