breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार, उद्धव ठाकरे पुन्हा गरजले

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।

विधानसभा निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. त्यानंतर राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नाही त्यानंतर राज्यपालांने सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनीच भाजपला सत्ता स्थापेसाठी आमंत्रित केलं आहे. यावेळेस विशेष म्हणजे ‘आमचं ठरलंय’ म्हणणार्या भाजप-शिवसेना महायुतीमधील ‘फिफ्टी-फिफ्टी’चा घोळ संपत नसल्यामुळे हा तिढा वाढत जाऊन ‘आमचं बिघडत चाललंय’ अशी स्थिती सद्या निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही असतानाच आज राज्यात वेगवान हालचाली सुरू आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक संपली आहे. मालाडमधील द रिट्रीट हॉटेलमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आपलं सरकार बनणार, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार. तर अजूनही युती तोडली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button