breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“मुंबईने माणुसकी गमावली;निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”- अमृता फडणवीस

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री BMC ने क्वारंटाइन केलं. या विषयाबाबात अनेक कारणे जोडून सोशल मीडियावर दाखवलं जात आहे. आणि आता अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांंनी सुद्धा ट्विट करुन तपास प्रक्रियेतील संबधितांवर ताशेरे ओढले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री BMC ने क्वारंटाइन केलं. या विषयाला सोशल मीडियावर वेगवेगळे फाटे फ़ुटत आहेत. अशातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांंनी सुद्धा ट्विट करुन तपास प्रक्रियेतील संबधितांवर ताशेरे ओढले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

अमृता फडणवीस यांंच्या या ट्विटला युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी या ट्विटला उत्तर देत तुम्हाला पोलिसांच्या सिक्युरिटीवर विश्वास नसेल तर सुविधा सोडुन द्या ना असे आवाहन केले आहे.

तसेच खासदार प्रियंंका चतुर्वेदी यांनी सुद्धा उत्तर देत हे ट्विट लज्जास्पद असल्याचे सांगितले आहे, मुंबई पोलिसांची सुरक्षा वापरता, तुमची बेसुर गाणी ऐकण्यासाठी पोलिसांना प्रेक्षक बनवता. AXIS बॅंकेत पोलिसांचे अकाउंटस फिरवता आणि बिहार निवडणुका येताच मुंबई पोलिसांना नावं ठेवुन अपमान करताय हे लज्जास्पद आहे. असे प्रियंका यांनी म्हंंटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button