breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना. हा मृत्यू नसून खून”- सुप्रिया सुळे

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली असून, मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.ही अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी झालेली आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्यात. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button