breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मनोहर लाल खट्टर यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, जजपा अध्यक्ष दुष्यंत चौटाला बनले उपमुख्यमंत्री

पानीपत – भाजपचे मनोहर लाल खट्टर सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. खट्टर त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर जजपा पक्षाचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी दोघांनी शपथ दिली. हरियाणातील नवीन सरकार स्थापनेसाठी जजपा आणि 7 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर इतर मंत्र्यांच्या शपथविधी दिवाळीनंतर होणार आहे.

खट्टर यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, काँग्रेस नेता आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल व त्यांचे सुपुत्र सुखबीर बादल उपस्थित होते. याशिवाय चौटाला परिवारातून नैना चौटाला, दुष्यंत चौटाला यांच्या पत्नी मेघाना यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. यांसह तुरुंगात शिक्षा भोगत असलेले दुष्यंत चौटाला यांचे पिता अजय सिंह चौटाला हे शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत होते. अजय सिंह यांना शनिवारी दोन आठवड्यांसाठी पॅरोल मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button