breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भोसरी शिवसेना एकवटली…आमदार महेश लांडगे यांच्यासाठी ‘वज्रमूठ’

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची बैठक

भोसरी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक झाले सक्रीय

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’च्या धर्माचे पालन करीत आमदार महेश लांडगे यांनी माझे काम प्रामाणिकपणे केले आहे. भोसरीत मला तब्बल ३८ हजार मतांचे ‘लीड’ मिळवून दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मी आणि भोसरीतील तमाम शिवसैनिक ‘महायुती’चे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार लांडगे यांच्या प्रचारासाठी सर्वोतोपरी सक्रीय झालो आहोत, असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

        विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फन रेसिडेंन्सी या हॉटेलमध्ये भोसरीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, भाजपचे प्रभारी बाबू नायर, सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुरज लांडगे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रुपेश कदम, उपशहर प्रमुख अभिमन्यू लांडगे, विधानसभा समन्वयक सर्जेराव भोसले, विभाग संघटिका आशाताई भालेकर, विभाग संघटक राहुल गवळी, विभाग युवा अधिकारी कुणाल जगदाळे, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरी, प्रतिक चव्हाण, सुखदेव नरळे, अनिल सोमवंशी, जिल्हा समन्वयक युवा सेना सचिन सानप, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव, उपजिल्हा प्रमुख युवा सेना कुणाल किसनमहाराज तापकीर आदी उपस्थित होते.

त्यांनी भोसरीतून मला सर्वोतोपरी मदत केली. त्यावेळी मी विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ झाली आणि लांडगे यांना तिकीट मिळाले, तर आम्ही सर्व सहकारी लांडगे यांच्या पाठिशी संपूर्ण शिवसेनेची ताकद उभी करणार आहोत, असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

        यावेळी शिवसेना विभागप्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघ हा ‘महायुती’च्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला होता. त्यामुळे माझ्यासह अन्य काहीजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतु, विद्यमान आमदार लांडगे भाजपचे आहेत. त्यामुळे राज्य पातळीवरील ‘महायुती’च्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदार संघ भाजपला सोडण्यात आला. यामुळे काही लोकांमध्ये काहीशी अस्वस्थता होती. परंतु, आम्ही शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करणारे आहोत. त्यामुळे आम्ही या विधानसभा निवडणुकीत सर्वोतोपरी आमदार लांडगे यांच्यासाठी काम करणार आहोत.

जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत.

सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद म्हणाले की, मी स्वत: भोसरी विधानसभेतून शिवसेनेकडून इच्छुक होतो. मात्र, ‘महायुती’च्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदार संघ भाजपला सोडण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे आणि संपूर्ण भाजपने ‘महायुती’चे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून ३८ हजारांचे ‘लीड’ दिले होते. त्यामुळे आता आम्ही आमदार लांडगे यांना जास्तीत-जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button