breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

भोसरीत महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी ‘आरपीआय’ ची ‘भीम’ गर्जना

आमदार लांडगे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान वाखाणण्याजोगे
भोसरी | महाइन्यूज | विशेष प्रतिनिधी |

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी चळवळ वाढविण्यासाठी, आंबेडकरी विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता आणि आंबेडकरी चळवळीशी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती आमदार महेश लांडगे यांच्यासोबत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रियपणे सर्व कार्यकर्ते उतरले असल्याबाबतची एक बैठक बुधवारी (दि. ९) पार पडली.
‘आरपीआय’(A)चे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिका-यांची अजिंठानगर येथे पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी कार्तिक लांडगे, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(A)चे महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चांदमारे. रि. पा. ई. अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, रि. पा. ई. शहर कार्यध्यक्ष रमेश सुर्यवंशी, रि. पा. ई. शहर उपाध्यक्ष विलास गरड, अल्पसंख्याक आघाडी शहर कार्यध्यक्ष शेखलाल नदाफ, रिपब्लिकन श्रमिक बिग्रेड महाराष्ट्र सरचिटणीस संदिपान साबळे, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ईलाताई ठोसर, महिला शहर कार्याध्यक्ष रत्नमाला सावंत, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांनी भारतातील पहिले आणि जगातील दुसरे संविधान भवन भोसरी येथे उभारण्यासाठी सक्रीय योगदान दिले आहे. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान साक्षर करायला हवे, या विचारातून या संविधान भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विजन 2020 अंतर्गत या संविधान भवनाचा समावेश करून त्याचा योग्य पाठपुरावा केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान भावनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. संविधान भवनच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधान अभ्यास केंद्र, तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहेत. ई-लायब्ररी, संविधान दालने, चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका, अभ्यासवर्ग सुरु करण्यात येणार आहेत. या संविधान भवनामुळे आंबेडकरी चळवळीला उभारी मिळणार आहे. आंबेडकर विचार आणि संविधान दोन्ही गोष्टी यामुळे समाजापर्यंत आणखी चांगल्या पद्धतीने पोहोचणार आहेत.
संविधान भवना सोबतच आमदार महेश लांडगे यांनी आमदार निधीतून भोसरी विधानसभा मतदार संघात नऊ बौद्ध विहार, समाज मंदिर बांधली आहेत. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या या कामामुळे आरपीआयच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार महेश लांडगे यांचा जोमाने प्रचार करण्याचे ठरवले आहे. सर्वजण प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. काही कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या भरीव कामामुळे हा वाढता पाठींबा त्यांना मिळत आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या कामाविषयी आरपीआय आणि इतर सर्व घटक पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपुलकी वाटत आहे. सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने काम करणारा आमदार पुन्हा एकदा निवडून द्यायलाच हवा, असा चंग सर्वांनी बांधला आहे. त्याबाबत कार्तिक लांडगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. इतर काही ठिकाणी आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात कोणाचीही कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button