breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण
भीमा कोरेगाव दंगलीचे आरोपी संभाजी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करणार: गृहमंत्री अनिल देशमुख
![Bhima to take action against Koregaon riot accused Sambhaji Bhide, Ekbote: Home Minister Anil Deshmukh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/anil-deshmukh.png)
पुणे |
‘कोरेगाव भीमा प्रकरणी चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल’, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलेले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिलेली आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देशमुख म्हणाले की येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. या कारागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत, त्यामुळे कारागृहाच्या रचनेचा विचार करण्यात येत आहे. याबाबत एक मॅाडेल तयार करण्यात आलेल आहे. त्यांचे सादरीकरण झालेलं आहे.