breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

भाजपला दणका, नगरविकास खात्याने विकासकामांचा निधी थांबवला

मुंबई – राज्यात भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच सरकारने महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. आरे कारशेडच्या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला.

महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपला आणखी एक दणका दिला आहे. आता नगरविकास खात्याने विविध विकासकामांना दिलेला निधी थांबवला आहे.  ज्या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले नाहीत ती कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना हे आदेश दिले आहेत.

तसेच ज्या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत त्याची यादी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.  राज्यातील अनेक महापालिका नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. नगर विकास विभागाची कामे थांबून महाराष्ट्र विकास आघाडीने हा भाजपला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button