breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपचा हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ? घरवापसीबाबत केला खुलासा

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या राजकीय चर्चेला चांगलाच रंग चढला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेेले वैभव पिचड यांनी सूचक विधान केले आहे. सध्या तरी ‘घरवापसी’ करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काही भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा खुलासा केला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपूत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पिचड पिता पूत्र परत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी राजकीय चर्चा रंगली होती, यासंदर्भात पिचड यांनी एका वृत्तवाहिनीशी सूचक विधान केलं आहे.

‘माझ्याशी कुणाचाही संपर्क नाही. मी आहे त्या घरी सध्या तरी सुखी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही’ असं वैभव पिचड म्हणाले आहेत. वैभव पिचड यांनी आपण सध्यातरी भाजपमध्ये सुखी असल्याचे म्हणून गुगली टाकली आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, याचे संकेतच पिचड यांनी दिले आहे. त्यामुळे अहमदनगरच्या राजकारणात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button