breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
बिहार निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेत केले अनेक बदल
भाजप अध्यक्ष बनल्याच्या आठ महीन्यानंतर जेपी नड्डा यांनी शनिवारी आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. डॉ. रमन सिंह, अन्नपूर्णा देवी, मुकुल रॉय, जय पांडया पार्टी यांना पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांना महासचिव पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर, तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाने राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांना महासचिव पदावरुन हटवले आहे. त्यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.