breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

फडणवीसांकडून महाराष्ट्राशी गद्दारी, केंद्राकडे 40 हजार कोटी वळवल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत भडकले

मुंबई | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवत महाराष्ट्राशी गद्दारी केली, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री होण्यामागे मोठा कट होता, त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला.

‘अनंतकुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, केंद्राकडून नेहमी सावत्र भावासारखी वर्तणूक देण्यात येते, आता हे स्पष्ट होतं’ असं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मिळणारे केंद्राचे पैसे परत केले असतील, तर त्यांचा निषेध केला जाईल. महाराष्ट्राच्या विकासाबाबत कुठलाही प्रकार खपवून घेणार नाही’ असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करुन महाराष्ट्राशी द्रोह असल्याचा घणाघात केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button