breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
प्रतापराव चिखलीकर आणि मी काही दुश्मन नाही : अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/ajit-pawar1.jpg)
मुंबई | राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. त्याच धामधुमीत भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांच्या मुंबईतील प्रेम कोर्ट या निवासस्थानी ही भेट झाली. अजित पवार आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.
या भेटीनंतर अजित पवारांची माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “आमच्या भेटीत काही राजकीय अर्थ नाही. ते माझे चांगले मित्र आहे. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भाजपमध्ये आहे आणि मी राष्ट्रवादीत. त्यामुळे उगाच गैरसमज करु नका.”