breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नगरसेविका शहराध्यपदासाठी चर्चेत!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर आता निर्णयाकडे लक्ष

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मुंबईत बैठक

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये संघटनात्मक हालचालींना वेग आला असतानाच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

          पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी मुंबईत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली काळभोर यांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत नगरसेविका आणि माजी महापौर अपर्णा डोके आणि नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर उपस्थित होत्या.

दरम्यान, शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे अपर्णा डोके किंवा सुलक्षणा शिलवंत-धर यांच्याकडे शहर महिला आघाडीची धुरा देण्याबाबत खलबते सुरू आहेत. मात्र, सुलक्षणा शिलवंत –धर यांनी शहराध्यपदाबाबत आपण इच्छुक नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या १६ महिला नगरसेविका आहेत. मात्र, शहराध्यक्ष काळभोर यांच्यासोबत अवघ्या दोनच नगरसेविका अजित पवारांच्या भेटीला मुंबईत दिसल्या. सर्व महिला नगरसेवकांनी एकजूट दाखवणे अपेक्षीत होते, मात्र तसे दिसले नाही. याबाबत प्रत्येकाच्या प्रभागात काही कार्यक्रम, उद्घाटने असतात. त्यामुळे सर्व महिला नगरसेविका एकाचवेळी उपस्थित राहू शकत नाहीत, अशी पुष्टी देण्यात आली.

          महिला शहराध्यक्षपदी अपर्णा डोके किंवा सुलक्षणा शिलवंत-धर यांनी उदासिनता दर्शवल्यामुळे विद्यमान शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. याउलट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्कारानिमित्ताने झालेल्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली. याबाबत जाहीरपणे बोलण्यास नगरसेविका काळभोर, डोके आणि शिलवंत-धर यांनी टाळले आहे.

          संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या : चाकणकर

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यात पक्ष सत्तेत असला, तरी आपण संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच, विशाखा समिती, दक्षता समिती किंवा अन्य कमिट्यांवर संघटनेतील महिलांना संधी द्या. बैठका आणि शिबिरे घेवून संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना चाकणकर यांनी दिल्या आहेत, अशी माहिती शहाराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button