breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ठरलं! अजित पवार उपमुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार

मुंबई / महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपध घेणार हे निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबातून पहिल्या निवडणूक लढणारे, पहिल्यांदा आमदार होणाऱ्या आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज शपथ घेणाऱ्या 36 आमदारांची यादी राजभवनाने जाहीर केली आहे.

आदित्य ठाकरेंना पर्यटन किंवा शिक्षण खांत मिळण्याची शक्यता आहे. आज 25 आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची आणि 10 आमदार राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

शिवसेनेकडून हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

आदित्य ठाकरे
अनिल परब
उदय सामंत
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संदीपान भुमरे
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळचे अपक्ष आमदार (राज्यमंत्री)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री)
बच्चू कडू, अचलपूरचे अपक्ष आमदार (राज्यमंत्री)

काँग्रेसमधून हे नेते शपथ घेणार

के.सी.पाडवी
अशोक चव्हाण
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
विजय वड्डेटीवार
सुनील केदार
अस्लम शेख
वर्षा गायकवाड
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजित कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेणार

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ
जितेंद्र आव्हाड
नवाब मलिक
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
दत्ता भरणे (राज्यमंत्री)
अदिती तटकरे (राज्यमंत्री)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button