breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ला पूर्वनियोजित कट…व्हॉटस्एप ग्रुपच्या चॅट व्हायरल…

रविवारी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध केला जात आहे.मात्र त्याचसोबत हा हल्ला कोणी केला याबाबत बरेच संभ्रम निर्माण झाले आहेत..तसेच अनेक आरोप- प्रत्यारोप होत आहेत..हा हल्ला पूर्व नियोजित असल्याचं म्हटलं जात होत…मात्र त्याबाबत कोणतेही पुरावे हाती लागले नव्हते…पण व्हायरल झालेल्या एका व्हॉटस्एप ग्रुपच्या चॅटमधून हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे.

कोडवर्डच्या माध्यमातून याची रणनीती आखण्यात आली होती. दिल्ली पोलिसांकडून 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…बाहेरुन विद्यापीठात घुसलेल्या लोकांना कोडवर्ड देण्यात आले होते. जेणेकरुन हल्लेखोर आपल्या लोकांना ओळखतील आणि त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत…या अगोदर जेव्हा पेरियार होस्टलमध्ये मास्कधारी गुंडांनी हल्ला केला त्यानंतर या हल्ल्याचं प्लॅनिंग झालं. व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या या नियोजनाचे स्क्रीन शॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत…

स्क्रीन शॉट्सनुसार, या व्हॉट्सएप ग्रुपचे नाव Friends of RSS आहे. यात लिहलं आहे. डाव्या दहशतीच्या विरोधात लढण्यासाठी ग्रुप जॉईन करा. या लोकांना पकडून मार देणे हाच उपाय आहे. यानंतर एकाने लिहलं डीयूच्या लोकांचा प्रवेश तुम्ही खजन सिंह स्वीमिंगच्या बाजूने करुन द्या आम्ही इथं 25-30 जण आहोत. या घटनेबाबतचे आणखि किती आणि कोणते पुरावे हाती लागतील हे पाहण महत्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button