breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

चिंचवड विधानसभा : राहुल कलाटेंच्या ‘होमपीच’वर लक्ष्मण जगताप यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

वाकडमधील हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा जगताप यांना पाठिंबा

परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्याचे सोसायटीधारकांचा आश्वासन
चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या ‘होमपिच’वर अर्थात वाकड परिसरात महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे आता कलाटेंसमोर आव्‍हान निर्माण झाले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड व परिसरातील तीन हजारहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

वास्तविक, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड, पुनावळे या परिसरात शिवसेना गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे यांचा प्रभाव आहे. या भागातून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळवण्याची त्यांची राजकीय मोर्चेबांधणी आहे. त्यासाठी आमदार जगताप विरोधी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची रणनिती कलाटे यांनी आखली आहे. मात्र, आमदार जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी वाकड परिसरात बाईक रॅली काढली होती. याच भागातून जगताप यांना तब्बल २५ ते ३० हजार मतांचे ‘लीड’ देण्याचा निश्चय जगताप समर्थकांनी केला आहे. त्यामुळे कलाटे यांच्या ‘होमपीच’ वर जगताप यांनी लक्षकेंद्रीत केल्याचे दिसत आहे.

हिंजवडी आयटी पार्कमुळे वाकड परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. हजारोंच्या घरात असलेल्या या गृहनिर्माण सोसायट्यांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या गृहनिर्माण सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी नाही, तर मतदान नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर फेडरेशनने लोकशाहीच्या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
फेडरेशनचे पदाधिकारी व इतर सदस्यांनी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक संदिप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, राम वाकडकर यांच्यासोबत सोसायट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या पाणी संमस्येसंदर्भात चर्चा केली. आमदार जगताप यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच, संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्नही लवकरच सोडविण्याबाबत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. त्यामुळे फेडरेशनने विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी रहाटणी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी आमदार जगताप, फेडरेशनचे सुदेश सुधाकर राजे, के. सी. गर्ग, नगरसेवक संदिप कस्पटे, कैलास बारणे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, राम वाकडकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button