breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर ‘पीएचडी’ करायला 12 वर्ष वेळ लागेल – शरद पवार

मुंबई | महाईन्यूज

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायची इच्छा झाली आहे. पीएचडी करायची असेल तर त्यांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘संवाद साहेबांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीला त्यांनी सडेतोड उत्तर दिली.

पवार म्हणाले की, युवकांमध्ये देशाचं भवितव्य घडवण्याची धमक आहे. त्यासाठी तरुणांना संधी मिळाली पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरु करायला हव्यात. कॉलेज तरुणांना संधी मिळेल. पण त्यापूर्वी काळजी घ्यावी, असे विधान पवार यांनी केलं.

यावेळी पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. चंद्रकांत दादांना माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर त्यांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल,” असे शरद पवार म्हणाले.

मुंबईला एकेकाळी देशाची राजधानी म्हटलं जायचं. पण आता मी अस्वस्थ होतो. कारण त्यावेळी मुंबई गिरणी कामगारांची होती. आज इमारती आल्या आणि मुंबईकर गायब झाला. मुंबईत आता सर्व्हिस सेक्टर आले आहेत. त्यात आपण ताबा मिळवला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button