breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केंद्रात गो-गो म्हणा; कधी तुमचा खो-खो करतील समजणार नाही – रुपाली चाकणकर

पुणे |महाईन्यूज|

कोरोना गो.. सोबतच आता आम्ही ‘महाविकास आघाडी गो’ चा नारा देणार आहोत. असं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले होतं, पण त्यांच्या याच टिप्पणीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केलीय. आठवले साहेब.. केंद्रात गो-गो म्हणून बघा, कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला समजणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

एकीकडे देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात ते ‘गो कोरोना गो’ असं म्हणत असल्याचं दिसत आहे. यावरुन सोशल मीडियात बरेच मीम्स देखील तयार होत आहेत.

आपला राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी रामदास आठवले हे विधिमंडळ कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी देखील त्यांना कोरोनाबाबत विचारणा केली. त्याविषयी बोलतानाच आठवले असंही म्हणाले होते की, कोरोना गो सोबतच आता आम्ही महाविकासआघाडी गो चा नारा देणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button