breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

कृष्णकुंजवर कापला पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, मजकुराचा केक

मुंबई | मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज इथे मनसे वर्सोवा शाखाअध्यक्ष प्रशांत राणे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला.

प्रशांत राणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिम्मित हा केक बनवला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तो केक कापण्यात आला.

मनसे कार्यकर्ते घुसखोरांच्या मुद्द्यावर सध्या आक्रमक झाले आहेत त्यामुळेच विविध माध्यमातून ते आपला रोष या घुसखोरांच्या विरोधात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे महामेळाव्यात पाकिस्तानी – बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी देखील स्थानिक पातळीवर आक्रमक होत जोरदार विरोध केला.

मुंबई उपनगर आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांग्लादेशी घुसखोऱ्यांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर वर्सोवा आणि पनवेल्याच्या काही भागात असे पाकिस्तानी -बांग्लादेशी पर जा, अशी पोस्टर पाहायला मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button