breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारविरोधात काँग्रेसचा अविश्वास

बंगळुरू – कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार तो दाखल केला असून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी तो दाखल करून घेतला आहे, अशी माहिती विरोधीपक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी दिली.

विरोधीपक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. येडीयुरप्पा सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांवर सिद्धरामय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोरोनाच्या उपकरण आणि औषध खरेदीतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अविश्वास प्रस्तावावर विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही काँग्रेसच्या आमदारांनी केली होती. परंतु यावर नंतर निर्णय दिला जाईल, असे सांगून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज पुढे सुरू ठेवले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button