breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल सरकारची मंजुरी

नवी दिल्ली | महाईन्यूज|

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा युवक नेता कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. कन्हैयावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासंदर्भात अनेक महिने दिल्ली सरकारकडून टाळाटाळ सुरू होती. हा मुद्दा भाजपकडून सातत्याने लोकसभा व नुकत्याच आटोपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत उपस्थित केला जात होता.अखेर हा खटला चालवण्यास मंजूरी मिळाली आहे.

२०१६ साली फेब्रुवारी महिन्यात जेएनयूमध्ये कन्हैया याने देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे. याच संदर्भात दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०१९ मध्ये कन्हैयाविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.. त्यानंतर या फाईलवरून राजकारण सुरू होते.

दिल्ली सरकारच्या मंजुरीमुळे कन्हैया सहीत उमर खालिद, अनिर्बान, आकिब हुसेन, उमर गुल, बशरत अली व खालिद बसीर या अन्य विद्यार्थ्यांवरही देशद्रोह खटल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button