breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शरद पवार ‘वर्षा’वर

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले आहेत. बैठकीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पवार-ठाकरे यांची बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button