breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आधी राम लल्लाचं दर्शन मग भूमिपूजन, पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत, सर्व मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी 5 ऑगस्ट रोजी सुरुवातीला हनुमानगढीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राम लल्लांचं दर्शन घेतील. राम लल्लांच्या दर्शनानंतर नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करतील, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलेलं आहे.

“राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं फक्त 150 व्यक्तींना निमंत्रण दिलं जाणार आहे. याव्यतिरिक्त आणखी 50 व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करुन निमंत्रित मान्यवरांमध्ये अंतर राहणार आहे. याशिवाय कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त जण उपस्थित राहणार नाहीत”, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button