breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अपक्ष आमदार गीता जैन यांचा ‘मातोश्री’ वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई: मिरा-भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी शनिवारी ‘मातोश्री’ वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवणुकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव करून गीता जैन या अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप पक्षालाच पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते.

मात्र गेल्या एक वर्षांपासून भाजप पक्षातील स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी गीता जैन यांच्याकडे दुर्लक्षपणा केल्यामुळे नाराज गीता जैन यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. गीता जैन यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढलेली असून मिरा भाईंदर १४५ आणि १४६ अश्या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे आमदार झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button