breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची: उपमुख्यमंत्री
![Ajit Pawar used to be a bomb at petrol pumps: Deputy Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/1556014904-Ajit_Pawar.jpg)
पिंपरी |
बारामती लोकसभा निवडणुकीत मी 1991 मध्ये खासदारकीला उभं असताना पेट्रोल पंप चालवायला घेतलेला होता. पण उद्या कुठे भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करतो, अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप दुसऱ्यांना चालवायला दिला” असा किस्सा सांगत उपमुख्यमंत्र्यांनी हशा पिकवला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अकुंश पठारे यांच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. पुणे जिल्ह्यातील व्यस्त कार्यक्रमात पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पहाटे सकाळी सात वाजता पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आलेले होते.
वाचा- ओटास्किम परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुंडाला अटक