‘युवा वर्ग भारताचा भाग्यविधाता’; पद्मश्री गिरीश प्रभुणे
शिक्षण विश्व: प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड : युवा पिढी ही विकसित भारताची शक्ती आहे. या युवा पिढीतूनच भारताचा नवा भाग्योदय होऊ शकतो. आत्मनिर्भर भारताची संकल्पना ही युवा पिढीच घडवू शकते असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले.
कमला शैक्षणिक संकुलात 19 व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे आयोजन केले. या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक डॉ दीपक शहा त्यांचे सर्व सहकारी व कुटुंबीय, संचालक विद्यार्थी ,पालक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला .
प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्यानंतर गिरीश प्रभुणे म्हणाले या शिक्षण संस्थेमार्फत माझा सत्कार होत आहे . हा माझा खूप मोठा सन्मान आहे. ते पुढे म्हणाले एका कोलंबसाने ते पुढे म्हणाले शोधली आज हा देश जगात सर्वश्रेष्ठ देश बनला आहे . आपण सर्वजण कोलंबस बनलो तर , जगात भारताचे सर्वश्रेष्ठ देश जगात बनण्यास वेळ लागणार नाही . सन २०४७ साली भारत देश १०० वर्षाच्या स्वतंत्रता होईल, तोपर्यंत या सर्व समस्या आपण दूर करू . २० ते २५ वर्षे आपल्या हातात आहे. आपण त्या वयातील आहात की भारताचे तुम्ही भाग्य बदलू शकता . आज संस्थेच्या वतीने माझा पहिला सन्मान केला, मी डॉ दीपक शहा यांचे आभार मानतो .
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने १९ व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय प्रतिभा सृजन व्याख्यानमालाचे आयोजन व समाजातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा , संस्थापक डॉ. दीपक शहा व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांना पुणेरी पगडी प्रदान करून शाल ,पुष्पगुच्छ , स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानाने गौरविण्यात आले .यावेळी व्यासपीठावरती संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा ,खजिनदार भूपाली शहा , संचालिका डॉ तेजल शहा, दैनिक लोकमतचे संपादक व व्याख्याते संजय आवटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉ सतीश देसाई , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, डिंपल शहा समवेत प्राचार्या ,उपप्राचार्या व्यासपीठावर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई आपल्या मनोगतात म्हणाले, शून्यातून निर्माण करणे म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण डॉ दीपक शहा आहे असे मी मानतो. कर्तुत्व नेतृत्व सगळ्यांकडे असते पण दातृत्व असणे महत्त्वाचे आहे. श्री शहा यांनी नेहमी देण्याचेच काम केले आहे. तुम्ही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वळण देण्याचे काम करता तुमच्या या कामाला मानाचा मुजरा करतो . अशा शब्दात कौतूक केले .
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ४० हजार कुत्र्यांची नसबंदी खरंच झाली का? भाजपावर माधव पाटील यांचा गंभीर आरोप
सत्कारमूर्ती पद्मश्री गिरीश प्रभुणे बाबत ते पुढे म्हणाले , समाज घडविण्याची क्रिया एक माणूस करू शकते अशी माणसे समाजात आहे म्हणूनच घडत आहे तो एक माणूस म्हणजे आदरणीय , वंदनीय श्री प्रभुणे आहे हे सांगून आपल्या शब्दांना विराम दिला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ दीपक शहा मार्गदर्शन करताना म्हणाले , सन २००६ साली या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. आज येथे विविध शाखेतून ८ हजारा पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांना चांगले शिक्षण व संस्कार येथे दिले जातात .त्यांच्या पालकांनी विश्वास ठेवून येथे प्रवेश घेतला त्यांना धन्यवाद देतो .विद्यार्थ्यांची अपेक्षा, स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. त्याना चांगली दिशा देण्याचे काम येथे केले जाते. भविष्यात स्वतःला सिद्ध करायचे आहे त्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकास केला जातो. शिक्षण , कला, क्रीडा, साहित्य , नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने आज अनेक येथील विद्यार्थीनी आपली वेगळी छाप पाडून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे . संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यापुढे दरवर्षी तीन दिवसीय व्याख्यानमाला व उल्लेखनीय क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल अशी ग्वाही दिली .
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे आपल्या व्याख्यानात म्हणाले, आज माझ्यासमोर महाविद्यालयीन युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. तुम्हाला जीवनात डॉक्टर ,कलेक्टर जे व्हायचय ते व्हा , कुठल्याही क्षेत्रात जावा परंतु तुम्हाला सतत हसतमुख राहता आले पाहिजे . आनंदाने जगता आले पाहिजे . आजच्या नव्या पिढीला भाषा कळली पाहिजे व त्या भाषेत बोलता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यास करा, ज्ञानात भर पाडा . लक्षात ठेवा , जग बदलत आहे या बदलणाऱ्या जगात बदलणाऱ्या भाषेत बोलता आले पाहिजे.आजच्या युवा पिढीची क्षमता बुद्धिमत्ता ही मागच्या पिढीत नव्हती . प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून अपेक्षित यश संपादन करा असे शेवटी आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ राजेंद्र कांकरीया यांनी केली .सूत्रसंचालन डॉ रोहित अकोलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ सुवर्णा गोगटे यांनी केले प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी यांनी तर आभार उपप्राचार्या डॉ जयश्री मुळे यांनी मानले .




